स्वत:च केलेल्या उशिरामुळे विमान गाठू न शकलेल्या पोलिस महानिरीक्षकाने त्याचा राग एका फौजदारावर थुंकून काढल्याची घटना कोलकता येथे घडली.
उत्तर बंगालचे महानिरीक्षक कुंदनलाल तामता यांना 5 मे रोजी कोलकत्याहून बागडोरा येथे विमानाने जायचे होते. त्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर दाखल झालेले तामता विमान निघण्याची वेळ जवळ आली तरी उपाहारगृहात जेवण करीत बसले. तेथील उपनिरीक्षकाने त्यांच्या वारंवार हे लक्षात आणून दिले. पण, तामता यांनी त्याकडे कानाडोळा केला. अखेर विमान निघण्यास दहा मिनिटे बाकी असताना नियमानुसार विमानाचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे तामतासाहेब चिडले व रागारागात त्यांच्या मोटारीत जाऊन बसले.
उपनिरीक्षकाने त्यांना निघताना सॅल्यूट केला असता, पान खात असलेल्या तामतांनी त्याच्या अंगावर पिंक फेकली. यामुळे मनोधैर्य खचलेल्या उपनिरीक्षकाने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, सहकाऱ्यांनी समजावल्यानंतर त्याने पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली. तामता यांनी असे काही घडलेच नसल्याचा कांगावा केला असला, तरी खातेअंतर्गत चौकशी मात्र सुरू झाली आहे.
महाराष्ट्र पोलिस दलतही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अधिकारयावर राग काढण्याच्या घटना घडतात. एवढे खालच्या पातळीवर जाउन नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा