मंगळवार, १३ जुलै, २०१०

आता आबा पाटलांचाही ब्लॉग!

आपले गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही आता ब्लॉग सुरु केला आहे. तो सुरु करण्याचा हेतूही त्यांनी आपल्या पहिल्याच पोस्टमध्ये सांगितला आहे. याशिवाय फेसबूकवरही आबा आपल्या भेटीला आले आहेत. काय म्हणतात आबा वाचा....


मला हे म्हणायचंय …

प्रत्येक माणसाला स्वत:ची मत व्यक्तं करण्याचा लोकशाहीत अधिकार आहे. त्याचा मी आदर करतो.एखाद्याचं म्हणणं पटलं नाही तरी ते मान्य करणं ही लोकशाहीची संस्कृती आहे, तेच खर तर लोकशाहीचं सौंदर्य आहे. हे जे सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत लागु आहे ते आम्हा राजकारण्यांच्या बाबतीत ही अगदी तसच्या तस लागू पडतं.

पण होतं काय कि आम्ही राजकारणी जेव्हा बोलतो तेव्हा माध्यमं (इलेक्ट्रोनिक, प्रिंट आणि इतर सर्व) आमचं म्हणणं लोकांपर्यंत पोचवतात. हे करताना माध्यमं आपलं काम चोख बजावतात आणि हेच कर्तव्य पार पाडत असताना कित्येकदा माध्यमांना आपला जीव धोक्यातही घालावा लागतो. हे सारं करताना कधी कधी माध्यमांकडूनहि मानवी चुका होतात. आम्ही बोलतो एक आणि ते लिहीलं अथवा दाखवलं जातं ते मात्र वेगळ्याच संदर्भात. जो संदर्भ कदाचित त्या बोलण्याला लागूच पडत नसतो. अश्या वेळी आमचं मूळ मत ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये ना माध्यमं असतात ना जनता असते. आमचे खुलासे ही मग नीट छापून येत नाहीत. खुद्द मी या सगळ्याचा बळी झालेलो होतो.

“बडी बडी शहरो मी छोटी छोटी बाते होती रहती है!” हे उदगार मी २६/११ च्या पार्श्वभूमीवर काढले हे माध्यमांनी जे लिहीलं आणि दाखवलं ते अत्यंत संदर्भहीन होतं. म्हणजेच माझं मूळ वाक्य त्याच्या संदर्भापासून पूर्णपणे वेगळ करून दाखवलं होतं. ज्यासाठी पुढे मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा ही दिला!

अश्या परिस्थितीत माध्यमांपर्यंत आणि जनतेपर्यंत पोचण्याचा सोपा आणि कोणतेही हितसंबंध नसलेला, आणि गटबाजीला वाव नसलेला मार्ग म्हणून मी हे आधुनिक तंत्रज्ञान आता निवडले आहे. याच भावनेतून आज हा ब्लॉग मी तुमच्यासमोर आणतो आहे.

या ब्लॉग च्या माध्यमातून जे जे मी लिहीन त्या त्या वेळी मला त्या त्या विषयावर ‘तेच’ म्हणायचं आहे असं तुम्ही खुशाल समजू शकता. कारण तंत्रज्ञानाला हितसंबंध नसतात, कट नसतात, कुणाचा पत्ता कापायचा नसतो. तंत्रज्ञान हे नेहमीच जे आहे ते तसेच आणि त्याच स्वरुपात आरश्याप्रमाणे स्पष्ट लोकांपुढे ठेवत असते.

या ब्लॉग च्या माध्यमातून शक्यतोवर नियमितपणे आणि आवश्यक तेवढा संवाद मी तुमच्याशी साधत राहीन. हा संवाद माझा अधिकृत “कोट” म्हणून माध्यमे बिनदिक्कतपणे वापरू शकतात आणि जनता ही खात्रीपूर्वक हे माझच म्हणणं आहे या विश्वासाने हा ब्लॉग वाचू शकते.

शिव-काळाची आठवण करायची झाली तर हा ब्लॉग म्हणजे आधुनिक “ताम्रपत्र” च आहे.

जय महाराष्ट्र,

आर आर पाटील,
गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य.

२ टिप्पण्या:

महेंद्र म्हणाले...

मी कालच पाहिला. एक दोन कॉमेंट्स पण दिल्या आहेत. स्तुत्य उपक्रम.

Ditee म्हणाले...

आबांच्या ब्लॉगचे मनापासून स्वागत! आब्बानी व्यक्त केलेली मीडियाप्रति भीती खरी असली तरी एकतर्फी आहे. या ब्लॉगचा उपयोग त्यांच्या बद्दलचा "फ़क्त" गैरसमज दूर करण्यासाठी नाही तर सर्वसामान्य अन विशेषता नेट वापर करणारे "युवकांसाठी" पोलिस म्हणजे फ़क्त हिंदी/मराठी सिनेमातले विदूषक नाही तर असामान्य व्यक्ति आहेत. तसेच राजकारण म्हणजे फ़क्त टीवी पहातांना जेवण करतांना गप्पा नाहीत हे कळेल अशी अपेक्ष्या