गणेशोत्सवातील देखावे आता खुले झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गणेश मंडळांनी आकर्षक आणि उद्बोधक देखावे सादर केले आहेत. ते पाहण्यासाठी आता गर्दीही होऊ लागली आहे. देखावे पाहण्यासाठी जाताना आपल्या घराची आणि गर्दीत गेल्यावर स्वतःची काळजी घेण्याची आवश्यकता असते. त्यादृष्टीने पोलिसांनी केलेल्या काही उपयुक्त सूचना.
घरासंबंधी काळजी
- घरफोड्या टाळण्यासाठी सर्वांनी एकदम जाऊ नये
- दारे-खिडक्या व्यवस्थित बंद कराव्यात
- बाहेरचे दिवे सुरूच ठेवावेत
- आपल्या जाण्याची शेजाऱ्यांना कल्पना द्यावी
- घरातील देवापुढील दिव्यामुळे आगीबाबत काळजी घ्यावी
देखावे पाहताना
- मौल्यवान वस्तू, पैसे सोबत नेणे टाळावे
- सुरक्षित ठिकाणी वाहने उभी करावीत
- लहान मुलांच्या खिशात पत्ता, संपर्काची चिठी ठेवावी
- मुले हरवल्यास पोलिसांशी संपर्क साधावा
- संशयास्पद गोष्टी आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा
- महिलांची छेडछाड झाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा
- स्वाइन फ्लूमुळे नाका-तोंडाला रुमाल बांधावेत
तातडीच्या संपर्कासाठी क्रमांक
- नियंत्रण कक्ष- 100
२ टिप्पण्या:
उपयुक्त माहिती, जी दरवर्षी लोकांना नव्याने सांगावी लागते.
अतिशय चांगली माहिती आहे. मागील वेळी आम्ही देखावे पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी आमचा पंकज हरवला होता. पण त्याच्या खिशातील चिठ्ठीमुळे एका पोलिसाचा फोन आला अन तो पुन्हा सापडला.
टिप्पणी पोस्ट करा