मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यास चोख प्रत्युत्तर देणाऱ्या पोलिसांनी आपले कर्तव्य बजावताना कुठलीही कसूर ठेवली नाही. दहशतवादी बेछूट गोळीबार करीत असतानासुद्धा पोलिस अधिकाऱ्यांनी धाडसाने परिस्थितीचा सामना केला. दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे आणि धाडसी पोलिस अधिकारी विजय साळसकर यांच्यासह दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांचे बलिदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. त्या वीरांना पोलिसनामाचा सलाम!
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhhUuDWpk_hjyfv8Oja89qV-UMaH1zRLRG1no09wAm5CoF9zkmXbEWbWBoK_qQw2Kzs0PIAkOeRvYrI9t_YuOL5mMQhARogMCaJ756cWYAGbuNK2ulT6IwDAya3pKQGHVbV6hBHTxBJASY/s200/police+heros_Page_1.jpg)
1 टिप्पणी:
त्या सगळ्या शहिदांच्या कुटुंबियांना जाहिर झालेली मदत पोहोचली कां?? तुम्ही एक पत्रकार म्हणुन विचारतोय..
माझ्या तर्फे पण शहिदांना श्रध्दांजली..
टिप्पणी पोस्ट करा