शनिवार, २१ नोव्हेंबर, २००९

"स्टार'मुळे "स्टार' झालो!

मी एक ग्रामीण भागातील पत्रकार. नगरला महापालिका असली तरी शेवटी त्याची गणना एका मोठ्या खेड्यातच होते. अशा नगरमध्ये काम करताना जगाचा कानोसा घेता यावा, म्हणून इंटरनेटच्या विश्‍वात डोकावण्यास सुरवात केली. त्यातून माहितीचा खजिनाच मिळत गेला. विविध प्रकारचे ब्लॉग पाहून तर प्रभावित झालो. आपल्याकडे काही सांगण्यासारखे असेल, तर ते ब्लॉगच्या माध्यमातून मांडता येते याची जाणीव झाली आणि "पोलिसनामा' हा ब्लॉग सुरू केला. मी पाहिलेले बहुतांश ब्लॉग हे स्वतः बद्दल सांगणारे होते, विविध क्षेत्रातील घटना घडामोडींवर मते मांडणारे होते. पण गुन्हेगारी किंवा पोलिस यांच्यासंबंधी लिखाण करणारे ब्लॉग दिसले नाहीत. त्यामुळे असा एखादा ब्लॉग सुरू करावा असे वाटले.

गुन्हेगारी संबंधीच्या बातम्या आणि अन्य लेखन वृत्तपत्रांमधून होत असेच. पण तेथे बातमी देताना अनेक मर्यादा असता. त्याही पलिकडे जाऊन या क्षेत्रात लिहिण्यासारखे खूप काही आहे. विशेष म्हणजे लोकांना जागृत करणे, त्यांचे प्रबोधन करणे हे काम जर झाले, तर गुन्हेगारीला आळा बसू शकतो. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत हा ब्लॉग लिहित आहे. त्यामध्ये अनेकांचे मार्गदर्शन मिळाले, सूचना आल्या. तसा बदल करीत गेलो.

एकदिवस "स्टार माझा'च्या ब्लॉग स्पर्धेबद्दल वाचनात आले. त्यांना प्रवेशिका पाठविली. मधल्या काळात कामाच्या व्यापात हे विसरूनच गेलो होतो. अचानक स्टारच्या प्रसन्न जोशी यांचा मेल आला. या स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याचे वाचून आनंद झाला. खरा आनंद तर त्यानंतर झाला. जेव्हा ही बातमी ब्लॉग विश्‍वात पसरत गेली, तेव्हा अभिनंदन आणि शुभेच्छांच्या मेल आणि प्रतिक्रियांचा ब्लॉगवर तसेच इमेलवर पाऊसच पडला. मनात वाटले, "स्टार'मुळे आपणही "स्टार' झालो.
एका ग्रामीण भागातील ब्लॉग लेखकाला उत्तेजन देऊन स्टार माझाने एका अर्थाने या भागाचा गौरवच केला आहे. त्यामुळे प्रसन्न जोशी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार. माझे अभिनंदन करणारे आणि शुभेच्छा देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात मित्रांचेही आभार. असेच भेटत राहू.

कळावे
आपला

विजयसिंह होलम
अहमदनगर.
vijay.holam@gmail.com

१० टिप्पण्या:

नीरजा पटवर्धन म्हणाले...

tumache hardik abhinandan. Savadine blog vachun tyavar pratikriya kalaven. Bakshisasamarambhachya divashi bhetu kadachit.
Neeraja Patwardhan

Suryakant Dolase सूर्यकांत डोळसे म्हणाले...

विजयसिंह होलम...
मित्रा अभिनंदन !
ही बातमी वाचून आनंद वाटला.
भावी कार्यासाठी शुभेच्छा !!

रविंद्र "रवी" म्हणाले...

अभिनंदन

paps sapa म्हणाले...

Abhinandan
keep up the good work..
keep blogging..

:)

भानस म्हणाले...

अभिनंदन! अतिशय आनंद वाटला. अनेक शुभेच्छा!:)

अनामित म्हणाले...

Shri Holam : Your blog is utterly unique. In my opinion, you should never have taken part in a school-boyish exercise of handing out candies to blog-boys. Still if it brings you recognition and happiness, one could say something half-decent has come out of it.

Keep up the good work. And thanks a lot for letting us read your thoughts on a subject which nobody else covers in the blog-world.

प्रमोद देव म्हणाले...

विजयराव,तुम्ही तुमच्या जालनिशीसाठी निवडलेला विषय अतिशय महत्वपूर्ण असा आहे. पोलिस आणि त्यांचे आयुष्य हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. सवडीने आपलं लेखन वाचून त्यावर जरूर अभिप्राय देईन.
स्पर्धेतल्या यशाबद्दल आपलं सहर्ष अभिनंदन.

Minanath Dhaske म्हणाले...

Holam saaheb.. aapalya shubhechha baddal aabhar aani aapale manapoorvak abhinandan... Tumacha blog vegala aahe.. tyache vegalepana japa aani touch madhe raha.. mazya mitranchya yadeet aapan aalyas aamhas anandach hoyil...
dhanyawaad.

Useful Infromation म्हणाले...

वाचून अतिशय आनंद वाटला.
स्पर्धेतल्या यशाबद्दल शुभेच्छा !!

Unknown म्हणाले...

नगरी