रविवार, २४ मे, २०२६

अरे, हा मोटेगावकर तर पक्का भोंदू...

अरे, हा मोटेगावकर तर पक्का भोंदू...

NEET पेपर फुटीतील एक प्रमुख आरोपी लातूरच्या RCC क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर याचे अनेक व्हिडिओ आता समोर येत आहेत. त्यामध्ये त्याने पेपर कसे फोडले, किंवा याबद्दल पूर्वी त्याचे काय मत होते, वगैरे मुद्दे समोर आले.

आता मोटेगावकर याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. तो खरा मानला तर मोटेगावकर हा केवळ धंदेवाईक आणि पक्का बोंधू असल्याचे समोर आले आहे. विज्ञान शाखा निवडून प्रगतीच्या दिशने निघाले असताना अशा धंदेवाईक आणि अंधश्रद्धाळूवर विश्वास ठेवणारे पालक आणि विद्यार्थी यांचीही कीव करावी तेवढी कमीच आहे.

आता व्हायरल झालेल्या व्हिडिओत मोटेगावकर त्याच्या क्लाससमधील बाकांवर चढलेला दिसत आहे. त्याच्या हातात एक भांडे आणि दुसऱया हातात आंब्याची पाने आहेत. तो या आंब्याच्या पानांनी तांब्यातील पाणी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर शिंपडत आहेत. पाणी शिंपडताना ते विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणत आहेत की, तुमचा नंबर आता एम्सला लागणार. हा योग खूप वर्षानंतर आला आहे,  असे तो विद्यार्थ्यंना म्हणत एकएका बाकावरून पुढे चालत जात सर्व विद्यार्थ्यांच्या अंगावर हे पाणी शिंपडत आहे.

एका बाजूला उघड धंदा आणि दुसरीकडे अशी उघड अंधश्रद्धा असे ही निव्वळ धंदेवाईक भोंदू व्यक्तीमत्व असल्याचे यातून दिसते.

एम्स ही भारतातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था आहे. तेथे वेद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अशा वैज्ञानिक विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. तेथून देशाचे भावी डॉक्टर घडतात.

एम्सच नव्हे तर इतरही वैद्यकीय संस्थांमध्ये डॉक्टर बनण्यासाठी पाठविण्यात येणारे विद्यार्थी एक तर धंदेवाईक मार्गाने किंवा अंधश्रद्धेच्या मार्गाने पाठविण्याचा हा प्रकार आहे. यातून घडणारे डॉक्टर रुग्णांवर उपचार कसे करणार?

एकूण काय तर मोटेगावकरसारख्यांनी या क्षेत्राचा शुद्ध धंदा केला आहे. एका बाजूला लाखोंचे व्यवहार आणि दुसरीकडे भोंदूगिरी. अशा सर्व गैरमार्गाने विद्यार्थ्यांना आकर्षित करून पैसा कमवायचा एवढाच यांचा उदेदेश आहे. अनेक पालक आणि विद्यार्थी याला बळी पडतात. पुढे हेच प्रकार सुरू राहतात. एकदा क्लास अडमिशन घेतले की पेपर फोडून नाही तर पाणी शिंपडून आम्ही तुमच्या मुलाला डॉक्टर करणारच, तुम्ही फक्त पैसा फेका, असाच हा प्रकार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: