रविवार, २४ मे, २०२६

अरे, हा मोटेगावकर तर पक्का भोंदू...

अरे, हा मोटेगावकर तर पक्का भोंदू...

NEET पेपर फुटीतील एक प्रमुख आरोपी लातूरच्या RCC क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर याचे अनेक व्हिडिओ आता समोर येत आहेत. त्यामध्ये त्याने पेपर कसे फोडले, किंवा याबद्दल पूर्वी त्याचे काय मत होते, वगैरे मुद्दे समोर आले.

आता मोटेगावकर याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. तो खरा मानला तर मोटेगावकर हा केवळ धंदेवाईक आणि पक्का बोंधू असल्याचे समोर आले आहे. विज्ञान शाखा निवडून प्रगतीच्या दिशने निघाले असताना अशा धंदेवाईक आणि अंधश्रद्धाळूवर विश्वास ठेवणारे पालक आणि विद्यार्थी यांचीही कीव करावी तेवढी कमीच आहे.

आता व्हायरल झालेल्या व्हिडिओत मोटेगावकर त्याच्या क्लाससमधील बाकांवर चढलेला दिसत आहे. त्याच्या हातात एक भांडे आणि दुसऱया हातात आंब्याची पाने आहेत. तो या आंब्याच्या पानांनी तांब्यातील पाणी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर शिंपडत आहेत. पाणी शिंपडताना ते विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणत आहेत की, तुमचा नंबर आता एम्सला लागणार. हा योग खूप वर्षानंतर आला आहे,  असे तो विद्यार्थ्यंना म्हणत एकएका बाकावरून पुढे चालत जात सर्व विद्यार्थ्यांच्या अंगावर हे पाणी शिंपडत आहे.

एका बाजूला उघड धंदा आणि दुसरीकडे अशी उघड अंधश्रद्धा असे ही निव्वळ धंदेवाईक भोंदू व्यक्तीमत्व असल्याचे यातून दिसते.

एम्स ही भारतातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था आहे. तेथे वेद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अशा वैज्ञानिक विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. तेथून देशाचे भावी डॉक्टर घडतात.

एम्सच नव्हे तर इतरही वैद्यकीय संस्थांमध्ये डॉक्टर बनण्यासाठी पाठविण्यात येणारे विद्यार्थी एक तर धंदेवाईक मार्गाने किंवा अंधश्रद्धेच्या मार्गाने पाठविण्याचा हा प्रकार आहे. यातून घडणारे डॉक्टर रुग्णांवर उपचार कसे करणार?

एकूण काय तर मोटेगावकरसारख्यांनी या क्षेत्राचा शुद्ध धंदा केला आहे. एका बाजूला लाखोंचे व्यवहार आणि दुसरीकडे भोंदूगिरी. अशा सर्व गैरमार्गाने विद्यार्थ्यांना आकर्षित करून पैसा कमवायचा एवढाच यांचा उदेदेश आहे. अनेक पालक आणि विद्यार्थी याला बळी पडतात. पुढे हेच प्रकार सुरू राहतात. एकदा क्लास अडमिशन घेतले की पेपर फोडून नाही तर पाणी शिंपडून आम्ही तुमच्या मुलाला डॉक्टर करणारच, तुम्ही फक्त पैसा फेका, असाच हा प्रकार आहे. 

शुक्रवार, १ मे, २०२६

आता लग्नपत्रिकेचे निमित्त... छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान


 आता लग्नपत्रिकेचे निमित्त...

छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान

अमरावती जिल्ह्यातील मिर्झापूर गावातील एका मुस्लिम कुटुंबाची लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. खरे तर लग्नानंतरच्या स्वागत समारंभाची ही निमंत्रण पत्रिका आहे. मात्र, त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतच टीपू सुलतान यांचा 'प्रेरणास्थान' म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरूनच वाद निर्माण झाला आहे.

या पत्रिकेत एका आमचे प्रेरणास्थान म्हणून एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरीकडे टीपू सुलतान असा उल्लेख आहे. यावरून वाद निर्माण झाला असला तरी “हिंदू-मुस्लिम ऐक्य समोर नेण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे,” असे या कुटुंबाने ठामपणे सांगितले आहे.

ुख्य म्हणजे ही पत्रिका मराठी भाषेत छापण्यात आली आहे एरवी पत्रिकेत घरातील लहान मुलांची आणि राजकारण्यांची नावे छापण्यावरून टीका होते. या कुटुंबाने जरा वेगळा प्रयोग करून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचा प्रय़त्न केला आहे. मात्र, कोण त्याकडे कशा दृष्यीने पहातो, त्यावरून याचा परिणाम ठरत आहे. काहींना ही तुलना पटलेली नाही. त्यांनी यावर टीका केली आहे. तर काहींना हे कौतुकास्पद वाटत आहे. त्यावर या कुटुंबाचे म्हणने असे की, आम्ही नेहमीच सामाजिक ऐक्य जपण्याचे काम करत आलो आहोत. टीका करणाऱ्यांनी कितीही टीका करू द्या, आम्ही त्याकडे लक्ष देत नाही.”

स्थानिक गावकऱयांनाही यात काही वावगे वाटत नाही. उलट सामाजिक एकोप्याचा प्रय़त्न वाटतो. तर दुसरीकडे राज्यातून मात्र वेगळ्या प्रतिक्रिया उमटत असल्याचे सोशल मीडियातून दिसून येते.

काही तरी ‘मिसिंग’ आहे.…

एका बाजूला मुुंबई-पुणे दृतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे आज उद्घाटन झाले. त्याचवेळी दुसरीक़डे याच महामार्गावर पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. मिसिंह लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे वाहतूक आणखी जलद होणार असल्याचे एका बाजूला सांगण्यात येत होते, तर दुसरीकडे सलग सुट्टीला बाहेर पडलेले अनेक नागरिक कित्येक तास कोंडीत अडकून पडले होते. याचा अर्थ आपल्या व्यवस्थेत काही तरी मिसिंग आहे. ती मिसिंग लिंक शोधल्याशिवाय यातून मार्ग निघणार नाही.

 

यंत्रणा अपुरी आहे का? अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही का? की नागरिक आणि वाहनचालकांचे चुकते आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधून योग्य ती शिस्त लावण्याचा प्रय़त्न करायला हवा. विक एंडला एकदम बाहेर पडणारे नागरिक यामुळे दरवेळीच हा महामार्गच नव्हे तर इतरही ठिकाणी अशीच कोंडी झा्ल्याचे पहायला मिळते. अशावेळी सर्व यंत्रणा आणि व्यवस्था कुचकामी ठरल्याचेही पहायला मिळते. यावर उपाय शोधले पाहिजे. हे उपाय केवळ सरकार आणि यंत्रणच्या बाजूचे नाही, तर नागरिक, वाहनचालकांच्या बाजूनेही केले पाहिजेत. शिस्त, योग्य ते नियोजन, यंत्रणाची मर्यादा लक्षात घेऊन सु्ट्ट्यांचे टप्पे, निघण्याच्या वेळांमधील अंतर वगैरे गोष्टींचा बारकाईने विचार करून त्यादृष्टीने नियोजन हवे. ए. आय. च्या युगात या गोष्टी अवघड नाहीत. केवळ दोन्ही बाजूंनी इच्छाशक्तीची गरज आहे. केवळ यंत्रणेवर टीका करून, नारिकांना दोष देऊन अगर याचे राजकारण करून हा प्रश्न सुटणार नाही. रस्त्यावरच्या मिसिंग लिंक शोधून त्या जोडल्या तरी नागरिकांच्या सवयी, स्वभाव, गरजा यांच्यातील मिसिंग लिंक शोधून त्यावर उपाय करावे लागणार आहेत.