आता लग्नपत्रिकेचे निमित्त...
छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान
अमरावती जिल्ह्यातील मिर्झापूर गावातील एका मुस्लिम कुटुंबाची लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. खरे तर लग्नानंतरच्या स्वागत समारंभाची ही निमंत्रण पत्रिका आहे. मात्र, त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतच टीपू सुलतान यांचा 'प्रेरणास्थान' म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरूनच वाद निर्माण झाला आहे.
या पत्रिकेत एका आमचे प्रेरणास्थान म्हणून एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरीकडे टीपू सुलतान असा उल्लेख आहे. यावरून वाद निर्माण झाला असला तरी “हिंदू-मुस्लिम ऐक्य समोर नेण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे,” असे या कुटुंबाने ठामपणे सांगितले आहे.
मुख्य म्हणजे ही पत्रिका मराठी भाषेत छापण्यात आली आहे एरवी पत्रिकेत घरातील लहान मुलांची आणि राजकारण्यांची नावे छापण्यावरून टीका होते. या कुटुंबाने जरा वेगळा प्रयोग करून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्याचा प्रय़त्न केला आहे. मात्र, कोण त्याकडे कशा दृष्यीने पहातो, त्यावरून याचा परिणाम ठरत आहे. काहींना ही तुलना पटलेली नाही. त्यांनी यावर टीका केली आहे. तर काहींना हे कौतुकास्पद वाटत आहे. त्यावर या कुटुंबाचे म्हणने असे की, “आम्ही नेहमीच सामाजिक ऐक्य जपण्याचे काम करत आलो आहोत. टीका करणाऱ्यांनी कितीही टीका करू द्या, आम्ही त्याकडे लक्ष देत नाही.”
स्थानिक गावकऱयांनाही यात काही वावगे वाटत नाही. उलट सामाजिक एकोप्याचा प्रय़त्न वाटतो. तर दुसरीकडे राज्यातून मात्र वेगळ्या प्रतिक्रिया उमटत असल्याचे सोशल मीडियातून दिसून येते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा