तुमचा ई-मेल ऍड्रेस "लकी ड्रॉ'मध्ये निवडला गेला आहे. तुम्हाला पाच लाख अमेरिकी डॉलर आणि टोयोटा कार बक्षीस लागली... असे आमिष दाखवून एन-5 औरंगाबाद, येथील एका व्यक्तीला पाच लाख रुपयांना गंडवण्याची घटना ता.3 मे रोजी घडली होती. सिडको पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेने या घटनेचा तपास करीत एका नायजेरियन युवकाला मुंबईत अटक केली.
सिडको एन-5 भागातील अविनाश कंठे (वय 49, रा. सह्याद्रीनगर) यांना मागील महिन्यात त्यांच्या मेल आयडीवर चीनवरून टोयोटा कंपनीतर्फे एक ई-मेल आला होता. त्यात त्यांना त्यांचा ई-मेल आयडी लकी ड्रॉमध्ये निवडण्यात आल्याचा उल्लेख होता. श्री. कंठेंना पाच लाख अमेरिकी डॉलर आणि टोयोटा कार लागल्याचेही या मेलमध्ये लिहिलेले होते. बक्षीस लागल्याच्या आमिषाला भुलून कंठे यांनी ई-मेलला प्रतिसाद दिला. या वेळी त्यांच्याशी आरोपी डॉ. मार्क विल्यम, अजयकुमार दास, पंकजकुमार झा, काशी सुरेश पांडे, चंचलकुमार, स्नूक स्मिथ, डॅन कॉग; तसेच मुंबई येथील "रिद्धी-सिद्धी क्रिएशन' आणि पेवारस मेगा सेलच्या संचालकांनी वारंवार फोन; तसेच ई-मेलवर संपर्क साधला. आरोपींनी बक्षीस मिळवण्यासाठी त्यांना वेळोवेळी डॉ. मार्क विल्यमच्या बॅंक खात्यात पाच लाख 520 रुपये रक्कम भरावयाला लावली होती. ही रक्कम भरल्यानंतर आरोपी डॉ. मार्क याने शहरात येऊन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कंठेंची भेट घेतली. कंठेंना एक सीलबंद बॉक्स देत त्याने या बॉक्समध्ये पाच लाख अमेरिकी डॉलर असल्याचे सांगितले. मात्र, या नोटा मूळ रूपात आणावयाच्या असल्यास मुंबई येथून एक रसायन मागवावे लागेल, असे सांगत हे रसायन आणण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली.
श्री. कंठेंनी दीड लाख देण्यास नकार दिल्यामुळे भामटा डॉ. मार्क निघून गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे श्री. कंठेंनी सिडको पोलिस ठाण्यात नऊ आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आरोपींनी श्री. कंठेंना फोन करून पोलिसांत न जाण्याच्या धमक्या दिल्या होत्या. फरार डॉ. मार्क विल्यम हा मुंबई येथे वसई भागात असल्याची माहिती मोबाईल लोकेशनवरून पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस पथकाने मु ंबई येथून आरोपी डॉ. मार्क विल्यम ऊर्फ अली इब्राहिम शेहयू या नायजेरियन युवकाला अटक केली.
पंचतारांकित हॉटेलची चौकशी करणार
आरोपी डॉ. मार्क विल्यम हा औरंगाबादला आल्यानंतर जालना रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरला होता. नियमानुसार हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना विदेशी नागरिक हॉटेलमध्ये उतरल्यास माहिती देणे गरजेचे होते. मात्र ही माहिती हॉटेल व्यवस्थापनाने दिली नसल्यामुळे या पंचतारांकित हॉटेलची चौकशी करण्यात येणार असून, इतर फरार आरोपींचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी या वेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा