रविवार, २९ जून, २०१४

वर्दीच्या इज्जतीचा लढा

चित्रपटांतील पोलिसांची प्रतिमा हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. सामाजिक संस्था, संघटनांनी कधी आवाज उठविलाच, तरी तो अल्पजीवी तरी ठरतो किंवा चित्रपट नाहीतर त्या संस्थांच्या प्रसिध्दीपुरताच उरतो. अहमदनगरमध्ये पोलिस नाईक संजीव भास्कर पाटोळे या पोलिसाने स्वतःची नोकरी धोक्यात घालून एक लढा छेडला.

निमित्त ठरले जंजीर चित्रपटातील 'मुबंई के हिरो' गाण्याचे. या गाण्यातील नायिका प्रियंका चोप्रा आणि नायक रामचरण तेजा यांनी गणवेषाचे विडंबन केले असून या गाण्यामुळे पोलिसांकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलत असल्याचे पाटोळे यांना वाटते. त्यांनी ऑक्टोबर २०१३ मध्ये पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार केली. ती तेथे बसलेल्या वर्दीवाल्यांनीच गांभिर्याने घेतली नाही. पोलिस मग पाटोळे यांनी कोर्टात धाव घेत खासगी फिर्याद दिली. कनिष्ठ न्यायालयात ती फेटाळण्यात आली. त्याविरूद्ध त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. तेथे न्यायाधीशांनी चोप्रा, तेजा यांच्यासह चित्रपट निर्मार्ते-दिग्दर्शकांना नोटीस पाठवून न्यायालयात म्हणणे सादर करण्यास बजावले. आता न्यायालयात काय व्हायचा तो निर्णय होईल. चित्रपट आणि काही प्रसारमाध्यमांच्या दृष्टीने पोलिस हा चेष्टेचा विषय असतो. काही अपवाद वगळता आजवर सरकारकडून याला विरोध झाला नाही.

१९५० मध्ये बॉम्बे टॉकिजच्या 'संग्राम' चित्रपटातील एका दृष्यात पोलिसाला भररस्त्यात बदडलेले दाखविले होते. याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी घेतली. त्यांनी निर्माते अशोककुमार यांना बोलावून एका दिवसात चित्रपटाचे प्रदर्शन बंद करायला लावले. त्यानंतर गेल्या कित्येक वर्षांत राज्यकर्त्यांकडून अशी ठोस भूमिका घेतली गेली नाही. गेल्याच वर्षी मुंबईत डॉ. सत्यपालसिंग आयुक्त असताना अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या पुढाकारातून चित्रपट निर्माते-दिग्ददर्शकांची एक बैठक घेण्यात आली. चित्रपटांमधून पोलिसांबद्दल वाईट व चुकीचे चित्रण दाखवू नये, अशी विनंती या बैठकीत करण्यात आली. बहुतांश चित्रपटांत पोलिसांचे चित्रण विनोदवीर, केस वाढलेले, पोट सुटलेले, वेंधळे, पैसे आणि मारही खाणारे असे केले जाते. गुंड, अतिरेकी, राजकारणी यांनी केली नाही एवढी पोलिसांची बेइज्जती त्यात होते. अर्थात ब्लॅक फ्रायडे, सिंघम, दबंग, गंगाजल असे काही चित्रपट अपवाद ठरतील. एकूणच नागरिकांमध्येही पोलिसांबद्दल चांगले बोलले जात नाही, त्याला पोलिसांचे वर्तनही तेवढेच जबाबदार आहे, त्यामुळे चित्रपटांतील अशा दृष्यांना प्रेक्षकांच्या टाळ्या मिळतात. चित्रपटातील पोलिसांची प्रतिमा बदलण्यासाठी प्रथम नागरिकांच्या मनात ती बदलायला हवी.      (दखल.. महाराष्ट्र टाइम्स)

३ टिप्पण्या:

Vijay Shendge म्हणाले...

पण बहूअंशी हे चित्रण वास्तववादी आहे असे नाही वाटत आपल्याला. नुकतीच मी एका पोलिस ठाण्यात एका पोलिसाला तीन हजार रुपये लाच दिली आहे. गुन्हा काहीच नव्हता माझा. किरकोळ भांडण होती. मी दिलेली लिंक सुद्धा पहा. पोलिस हे नागरिकांचे संरक्षण करत नाहीत तर त्यांना त्रास कसा होईल आणि त्याची मान आपल्या पंजात कशी सापडेल हेच पहात आले आहेत. वाहुतुकीचे नियंत्रण करायचे सोडुन अधिकाधिक पावत्या कशा फाडता येतील याचीच काळजी पोलिसांना असते. हे वास्तव नाही का ? तुम्हाला पटत नसेल तर चला एक दिवस माझ्याबरोबर फेरफटका मारा मी तुम्हलावास्त्व दाखवतो.

Unknown म्हणाले...

Marathi Ukhane

Marathi Ukhane म्हणाले...



Love Status in Marathi

Marathi Attitude Status

Motivational Status in Marathi

Marathi Status on life

Friendship Status in marathi

birthday Wishes in Marathi

Marathi Ukhane